Sunday, 21 December 2025

विज्ञान व नवोन्मेषातून मानवकल्याणाचा संदेश देणारे डॉ. माशेलकर यांचे कार्य प्रेरणादायी

 विज्ञान व नवोन्मेषातून मानवकल्याणाचा संदेश देणारे

डॉ. माशेलकर यांचे कार्य प्रेरणादायी

– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या ‘More from Less for More’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

 

मुंबईदि. 20 : विज्ञानशिक्षण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून समाजातील विषमता दूर करून मानव कल्याणाचा जागतिक संदेश देणारे पद्मविभूषण डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांचे कार्य तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

आंतरराष्ट्रीय मानवी एकात्मता दिनाचे औचित्य साधून इटरनल कॉर्पोरेट मीडिया प्रा. लि. व Inspiring India यांच्या संयुक्त विद्यमाने ताजमहाल पॅलेसकुलाबामुंबई येथे आयोजित ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व सुशिल बोर्डे यांच्या More from Less for More : Innovation’s Holy Grail या पुस्तकाचे प्रकाशन  मंत्री चंद्रकांतदादा पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) चे एमेरिटस प्राध्यापक पद्मविभूषण प्रा. डॉ. एम. एम. शर्मारिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश डी. अंबानीबजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष निरज बजाजगोडरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे चेअरमन व एम.डी. नादिर गोदरेजमॅरिको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मरिवालाकाइनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्सच्या संस्थापक व सीईओ सुलज्जा मोटवानीइटरनल कॉर्पोरेट मीडिया प्रा. लि.चे चेअरमन कृपाशंकर तिवारी तसेच एमडी व सीईओ अलोक तिवारी यांच्यासह उद्योगशिक्षण व संशोधन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi