Friday, 12 December 2025

पुणे रिंग रोड प्रकल्प, रस्त्याची कामे व मेट्रो कॅरिडोरची कामे प्रगतीपथावर

 पुणे रिंग रोड प्रकल्परस्त्याची कामे व मेट्रो कॅरिडोरची कामे प्रगतीपथावर

- मंत्री दादाजी भुसे

            नागपूरदि. 12 : पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड सह विविध रस्ते व मेट्रो प्रकल्पाची कामे सुरु आहेत. रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम मे 2028 पर्यंत आणि पश्चिमेकडील भागाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होईल. तसेच हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरच्या कामाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्यात येईलअशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

सदस्य राहुल कुल यांनी पुणे रिंग रोड व इतर प्रकल्पासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत सदस्य सुनील शेळकेअभिजित पाटील यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi