Tuesday, 2 December 2025

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार

 कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         नाशिक महापालिकेचा क्लीन गोदावरी बॉण्डनॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध

·         गोदावरी स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा

 

मुंबईदि. 2 :- दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे. विकास भीविरासत भी’ हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश मार्गदर्शक असून कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत ऐतिहासिक वारशाचेही जतन करण्यात येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

       नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा क्लीन गोदावरी बॉण्डसमारंभपूर्वक सूचीबद्ध करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य सचिव राजेश अग्रवालनगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के.एच. गोविंदराजनॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, 'मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीविभागीय आयुक्त प्रवीण गेडामकुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi