सैनिकी शाळांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
शासन सकारात्मक
- शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
नागपूर, दि. १३ : विद्यार्थ्यांमध्ये सैनिकी शिस्त यावी, त्यांना एनडीए मध्ये प्रवेश घेता यावा या उद्देशाने सैनिकी शाळांना केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले आहे. राज्यातील या शाळांना सोयी सुविधा पुरविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य सदाशिव खोत यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने आलेल्या चर्चेत सदस्य ज.मो.अभ्यंकर यांनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, केंद्र सरकारने देशात पीपीपी तत्वावर १०० शाळा सुरू केल्या आहेत. सातारा सैनिकी शाळेप्रमाणेच राज्यातील या नवीन सैनिकी शाळांमध्ये अनुदान, सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment