Sunday, 14 December 2025

पनवेल, नवी मुंबई परिसरातील सिडकोच्या घरांच्या दर्जाबाबत चौकशी करू

 पनवेलनवी मुंबई परिसरातील सिडकोच्या घरांच्या दर्जाबाबत चौकशी करू

-         नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

नागपूरदि. १३ : पनवेलनवी मुंबई परिसरात सिडकोमार्फत बांधण्यात येणाऱ्या घरांचा दर्जा चांगला आहे. तरीही या घरांच्या दर्जाबाबत सदस्यांनी केलेली सूचना तसेच या बाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची चौकशी केली जाईलअसे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य विक्रांत पाटील यांनी यासंदर्भात विधान परिषदेत नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्यासिडकोकडून विक्री केलेल्या घरांसाठी दोन वर्षांसाठी देखभाल दुरुस्ती शुल्क घेतले जाते. या निधीतून इमारत देखभालपाणीवीजलिफ्टची देखभाल दुरुस्ती केली जाते. सामायिक जागेतील वीज व पाणी बिलतसेच सुरक्षा खर्चासाठी घेतलेली आगाऊ रक्कम सोसायटी स्थापन झाल्यानंतर त्या सोसायटीकडे वर्ग केली जाते. तसेच ५१ टक्के रहिवासी तयार झाल्यास सोसायटी नोंदणी करून देण्याचा सिडकोचा प्रयत्न असून त्यानंतर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित सोसायटीकडे दिली जातेअसे राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्यासिडकोच्या घरांच्या प्रश्नासंदर्भात सर्व संबधित सदस्यांसमवेत बैठक घेतली जाईल. तसेच या घरांच्या मालमत्ता कराबाबतचा विषय न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईलअसेही त्यांनी सांगितले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi