हेरे सरंजाम जमिनीचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये करण्याचा निर्णय पुढील १५ दिवसात करणार
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर, दि. ११ : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हेरे सरंजाम संदर्भातील इनाममध्ये सध्या ५५ गावे असून या हेरे सरंजाम जमिनीचा धारणाधिकार भोगावटादार वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये करण्याचा निर्णय पुढील १५ दिवसात करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
विधानसभेत सदस्य शिवाजी पाटील यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, या प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी अभिलेखाशी संबंधित वाद निर्माण झाले असल्यास प्रांताधिकारी (एसडीओ) यांच्या अध्यक्षतेखाली डीवायएसएलआर आणि तहसीलदार यांची समिती तयार करण्यात येणार असून या समितीसमोर स्थानिक पातळीवरील वाद सोडवले जातील. ही समिती अशा सर्व वादांचा निपटारा एका महिन्याच्या आत करेल, असे महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी सांगितले.
000
No comments:
Post a Comment