पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडे केलेल्या वक्तव्यांमुळे भारतीय सैन्याचा अवमान झाला आहे. हे अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे की, त्यांच्या या बेजबाबदार विधानांचे पाकिस्तानी माध्यमांकडून खुलेपणाने कौतुक केले जात आहे.
भारतीय सैन्याने देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्या सैन्याच्या शौर्य, बलिदान आणि राष्ट्रनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी विधाने सहन केले जाणार नाहीत. अशा वक्तव्यांमुळे केवळ देशांतर्गत असंतोष निर्माण होत नाही, तर शत्रूराष्ट्रांच्या प्रचाराला खतपाणी घातले जाते.
या पार्श्वभूमीवर, आज दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता सर्व राष्ट्रप्रेमी नागरिक, व देशभक्त कार्यकर्त्यांच्या वतीने या विधानांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी निषेध आंदोलन आयोजित करण्यात येत आहे.
आज दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता स्थळ : अतुल भातखळकर आमदार कार्यालय, कांदिवली पूर्व.
No comments:
Post a Comment