Tuesday, 23 December 2025

चुकीच्या वारस नोंदीद्वारे जमीन हडप प्रकरणी कडक कारवाई; पालघर जिल्ह्यातील तलाठी व सर्कल अधिकारी निलंबित

 चुकीच्या वारस नोंदीद्वारे जमीन हडप प्रकरणी कडक कारवाई;

पालघर जिल्ह्यातील तलाठी व सर्कल अधिकारी निलंबित

महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

नागपूरदि. 13 : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात मौजे बाडापोखरण येथे चुकीची वारस नोंद करून जमीन हडप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असूनया प्रकरणात संबंधित तलाठी व सर्कल अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री बावनकुळे बोलत होते.      

या प्रकरणातील मूळ मालक जानकीबाई कडू यांचे १९८६ मध्ये निधन झाले असताना ही वारस नोंदी नियमबाह्य पद्धतीने करण्यात आली. अधिकाऱ्यांनी संगनमताने मालमत्ता चुकीचे वर्ष नोंद करून दिले. तसेच चार गुंठे जमिनीचे चाळीस गुंठे अशी नोंद केली. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. 

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले कीयासंदर्भात दोषींवर कठोर कारवाई करून निवृत्त अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्तीबाबत सखोल चौकशी करण्यात येईल. एकही निवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी कामावर ठेवला जाणार नाहीयाची दक्षता शासन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य योगेश सागर यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi