Saturday, 6 December 2025

संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी समाजाचे 'रोल मॉडेल' व्हावे

 संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी समाजाचे 'रोल मॉडेलव्हावे

आपण जे काही साध्य करतोते समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे शक्य होते. शाळासंस्थाशासनव्यवस्थाउद्योग  हे सर्व समाजाच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. त्यामुळे या समाजाला परत काहीतरी देणेहा प्रत्येकाचा धर्म आहे. संघर्षातून पुढे आलेले हे युवक समाजात रोल मॉडेल’ बनावेतअशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. जिथे पोहोचलात तिथे थांबू नका. संघर्षातून मिळवलेले यश हे पुढे समाजासाठी  अविरत कार्य करण्याची प्रेरणा ठरावी. स्थैर्य मिळाल्यानंतरही समाजासाठी काहीतरी देण्याची भावना मनात कायम ठेवावी,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

माणसाचे कार्यच त्याला अमरत्व देतं. कार्यातूनच माणूस जिवंत राहतो. म्हणून तुमचं कार्यच तुमची ओळख बनवाअसे सांगून कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व अनाथ युवकांचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात विनायक विश्वकर्मा या युवकाने मुख्यमंत्री यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत एक भावस्पर्शी कविता सादर केली.

आज घ्यायला नाही सरकाही द्यायला आलोय,

तुम्ही आरक्षण दिलंदारिद्र्यातून बाहेर आलोय

तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचेपण आम्ही तुम्हाला  देवा भाऊच म्हणणार

या ओळींनी भावनिक वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या युवकाचे कौतुक करतांना सांगितले की, या कवितेतून उमटणारी कृतज्ञता हीच या निर्णयाची खरी पावती आहे. समाजासाठी देण्याची भावना जर प्रत्येकामध्ये निर्माण झालीतर तेच खरे परिवर्तन आहे.

या संवादात उपस्थित युवकांनीही आपल्या अनुभवांची मांडणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाचे आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले कीया आरक्षणामुळे त्यांना शिक्षणरोजगार आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आहे.  आज आम्ही इतर अनाथ मुलांसाठी प्रेरणा आहोत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक अभय तेली व आभार प्रदर्शन जाणीव वृद्ध आश्रमाचे संचालक मनोज पांचाळ यांनी केले.

000000

राणे / सं.स.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi