राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार
· राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध
· शिखर संस्था म्हणून टाटा स्मारक रूग्णालय काम पाहणार
मुंबई,दि.2 : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग सेवा राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार 'आसाम कॅन्सर केअर मॉडेलच्या' धर्तीवर राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा एल 1,एल 2,एल 3 उपलब्ध होणार आहेत. एल 1 या स्तरामध्ये टाटा स्मारक रूग्णालय ही कर्करोगाकरिता शिखर संस्था म्हणून काम करणार आहे. एल 2, एल 3 या स्तरावर असणाऱ्या या रूग्णालयात कर्करोगासंबधित प्रशिक्षण मनुष्यबळ निर्माण करणे तसेच या आजाराविषयी संशोधन कार्यात प्रगती करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने याबाबत धोरण निश्चीत केले आहे.जिल्हास्तरावर सुरू होणाऱ्या उपचारामुळे अनेक कर्करोगग्रस्त रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा वेळ वाचणार आहे आणि स्थानिक जिल्ह्यातच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने या रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
No comments:
Post a Comment