दीर्घकाळापासून दृढ आर्थिक व व्यापारी भागीदारी आहे. ही भागीदारी अधिक मजबूत करणे आणि रशियन उद्योगांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश सुलभ करून देणे तसेच निर्यात प्रोत्साहन व व्यवसाय संधी देणे हा परिषदेचा मुख्य उद्देश असून रशिया आणि भारत यांच्यात फलदायी द्विपक्षीय संबंध निर्माण होतील. त्यांनी यावेळी रशियातील व्यापार व निर्यात संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या परिषदेमुळे भारत–रशिया व्यापार संबंध अधिक मजबूत होतील तसेच भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. परिषदेदरम्यान दोन्ही देशांतील उद्योजकांनी विविध क्षेत्रांतील धोरणे, संधी, आव्हाने आणि भविष्यातील सहकार्याबाबत सखोल चर्चा करत परस्पर संवाद साधला.
या परिषदेत भारतातील अन्न व पेय (एफ अँड बी), आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी), किरकोळ (रिटेल), कोल्ड-चेन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. उभय देशांतील विविध क्षेत्रांतील उद्योग प्रतिनिधींमध्ये सखोल चर्चा झाली. या परिषदेत १५० हून अधिक उद्योजक सहभागी झाले होते. रशियन शिष्टमंडळासाठी संरचित बी टू बी बैठका आयोजित करण्यात आल्या. यावेळी प्रिया पानसरे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment