भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"ऋषभायन-2" वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सव व
'वृषभ कला' प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
मुंबई, दि. १९ : ज्ञान, साधना, सुरक्षा आणि कृषी याबाबत महत्वपूर्ण विचारांदवारे साहित्य, कला, संस्कृती आणि सभ्यता प्रगल्भ करणारा "असी, मसी और कृषी" चा जीवनमार्ग भगवान वृषभदेव यांनी दाखविला. जगाच्या कल्याणासाठी हे विचार व ज्ञान येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश असून भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक म्हणजे ऋषभदेवांचे विचार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बोरिवली येथे ऋषभायन - २ या तीन दिवसीय वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सव प्रसंगी बोलत होते.
No comments:
Post a Comment