Tuesday, 16 December 2025

प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी

 प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचार समाप्तीसंदर्भात संबंधित विविध अधिनियमांमध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुद्रितइलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमांसह कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येत नाहीत. मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम ‘27अअ’ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 14(4) अन्वये महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीच्या मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर प्रचारावर निर्बंध असतात. त्यामुळे 15 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मतदानाची वेळ संपत असल्याने 14 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर प्रचाराची समाप्ती होईल. त्यामुळे 14 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 नंतर जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारणसुद्धा करता येणार नाही.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi