प्रास्ताविकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, झेब्रु शुभंकर हा रस्ता सुरक्षेचा संदेश वाहक आहे. पहिला हक्क पादचाऱ्यांचा या जाणिवेतून रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येणार आहे. ' झेब्रु' ला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात येणार आहे. झेब्रु रस्ता सुरक्षेचा जिवंत आत्मा ठरेल, या पद्धतीने मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येईल. पदपथांवर असलेले अतिक्रमण काढून तेथील रेलिंग न काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून नियमावली बनविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल.
कार्यक्रमात झेब्रु शुभंकरचे अनावरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment