वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा
पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना
- पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी राज्याची पणन व्यवस्था अत्याधुनिक व सर्व सोयी-सुविधायुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील
मुंबई, दि. 19 : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
अमेरिका - भारत कृषी-निर्यातविषयक घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत डाळिंबाचा पहिला कंटेनर रवाना होणे हे भारताची विश्वासार्हता, गुणवत्ता आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगततेचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे.
No comments:
Post a Comment