विदर्भ व मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष कमी करण्यात यश
विदर्भ आणि मराठवाड्यातील 13 लाख 83 हजार हेक्टरचा सिंचन अनुशेष जवळपास संपुष्टात आला आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इंडिकेटर बॅकलॉग समितीने निश्चित केलेल्या या अनुशेषापैकी 13 लाख 34 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आले असून, आता केवळ 49 हजार हेक्टरचा अनुशेष शिल्लक आहे. हा अनुशेष प्रामुख्याने अकोला, बुलढाणा आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे. अकोल्यात उर्वरित 14,530 हेक्टरच्या अनुशेषाच्या बदल्यात 2026-27 पर्यंत 19,335 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून, बुलढाण्यात 29 हजार हेक्टरच्या अनुशेषाविरुद्ध 1 लाख 68 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. विशेषतः झीगाव प्रकल्पासाठी यंदा 2,399 कोटींची तरतूद करण्यात आली असून, या एका प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा अनुशेषातून थेट अधिशेषात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment