Wednesday, 10 December 2025

वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई

 वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

नागपूरदि. १० : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. सदस्य हारून खान यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री श्रीमती मिसाळ बोलत होत्या.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या कीमॉलमध्ये मधल्या भिंती काढून फेरबदल करण्यात आले होते. यासाठीचा बदल आराखडा महापालिकेने २४ फेब्रुवारी २०२० रोजी मंजूर केला होता. तसेच बहुउद्देशीय हॉलसाठी पर्पज बदलाची परवानगी २०२३ मध्ये देण्यात आली होती. या काळात दोन कोटींच्या दंडाची वसुली आणि तीन कोटींचा प्रीमियम महापालिकेने घेतला. मे महिन्यात आलेल्या तक्रारीनंतर तपासात मॉलमध्ये शेडसह नवीन अतिक्रमण असल्याचे महापालिकेने मान्य केले असून त्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे. तसेच इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या स्ट्रक्चरल सुरक्षिततेबाबतही महापालिकेला तातडीने ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या मॉलमध्ये वारंवार विनापरवाना बांधकाम होत असल्यास एमआरटीपी कायद्यानुसार कठोर कारवाई करावीअशी सूचना विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi