Tuesday, 30 December 2025

ई-वाहनांना टोलमाफीची आठ दिवसात अंमलबजावणी करा

 ई-वाहनांना टोलमाफीची आठ दिवसात अंमलबजावणी करा

– विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर

 

नागपूर दि.१० : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावीअसे स्पष्ट निर्देश देत या निर्णयाच्या अंमलबजावणी पासून आज पर्यंतच्या काळात टोल घेतला गेला असल्यास पुरावा सादर केल्यावर नागरिकांना टोल परतावा द्यावाअसे आदेश विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी  दिले.

 

ई वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भात काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याची बाब सदस्य अनिल पाटील यांनी विधानसभेत मांडली. त्यावर अध्यक्ष अ‍ॅड. नार्वेकर यांनी हे निर्देश दिले.

अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी राज्यातील अपुऱ्या चार्जिंग स्टेशन्सचा मुद्दाही उपस्थित करतई-वाहनांसाठी किमान 120 के.डब्लू. (kw) क्षमतेची फास्ट चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सध्या उपलब्ध चार्जिंग स्टेशन्सवर वाहन चार्जिंगसाठी आठ तास लागत असल्याने ही व्यवस्था तातडीने सुधारावीअसेही त्यांनी म्हटले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi