Monday, 22 December 2025

वनसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखत तयारीसाठी आर्टीतर्फे आर्थिक सहाय्य

 वनसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना

 मुलाखत तयारीसाठी आर्टीतर्फे आर्थिक सहाय्य

 

            मुंबईदि.११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 'वनसेवा मुख्य परीक्षा-२०२४उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या मातंग व त्यातील तत्सम उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत १० हजार रुपये आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना १० हजारांचे एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.

मुलाखतीची तयारी अधिक प्रभावीपणे करता यावी आणि उमेदवारांवरील आर्थिक ताण कमी व्हावाहा आर्थिक सहाय्य या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.

 या संदर्भातील सविस्तर जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 'आर्टीच्याअधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी:

उमेदवारांनी 'आर्टी'च्या http:// https://arti.org.in या संकेतस्थळाला भेट देवून NOTICE BOARD या लिंकवर तपशील पहावातसेच अर्ज भरण्यासाठी

https://forms.gle/BSh7vMVDNonGK4C18 या लिंकवर गुगल फार्म भरावा.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi