विधिमंडळ हिवाळी अधिवेशन-2025 'दूरध्वनी पुस्तिके'चे
माहिती विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते प्रकाशन
· क्यू. आर. कोडमुळे डिजिटल पुस्तिका सहज उपलब्ध
नागपूर दि. 8 : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या 'हिवाळी अधिवेशन २०२५ दूरध्वनी पुस्तिके'चे प्रकाशन माहिती विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूर येथे अधिवेशनाकरिता येणाऱ्या राजकीय प्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार व नागरिकांना संबंधित शासकीय यंत्रणेशी सुलभ आणि त्वरित संपर्क साधता यावा, या उद्देशाने ही विस्तृत मार्गदर्शिका तयार करण्यात आली असून संबंधितांना ही उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते या दूरध्वनी पुस्तिकेच्या क्यू आर कोड चेही प्रकाशन करण्यात आले. या क्यू आर कोडमुळे संपूर्ण दूरध्वनी पुस्तिका आता डिजिटल स्वरूपात सहजपणे ऑनलाईन उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे पुस्तिका छापाईसाठी लागणाऱ्या शासनाच्या निधीतही मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.
No comments:
Post a Comment