‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची मुलाखत
मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या आकाशवाणीवरील प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात ‘सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व सायबर सुरक्षा’ या महत्त्वाच्या विषयावर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याचबरोबर सायबर फसवणूक, ऑनलाईन गुन्हे, बनावट संदेश, आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीचा गैरवापर अशा प्रकारच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मीडियाचा कसा जबाबदारीने वापर करावा, कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात, सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातील ही मुलाखत गुरूवार, दि. 25, शुक्रवार दि. 26, शनिवार दि.27, सोमवार दि.29 आणि मंगळवार दि. 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News on AIR’ या मोबाईल अॅपवरही ऐकण्यासाठी उपलब्ध असणार आहे. ही मुलाखत निवेदिका सुषमा जाधव यांनी घेतली आहे.
०००
No comments:
Post a Comment