महापारेषणला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाची
तीन राष्ट्रीय पारितोषिके प्रदान
डेहराडून , दि. १५ : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण उत्तराखंड विधानसभेच्या अध्यक्ष रितू खंडुरी भूषण व माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर, सर्वोत्कृष्ट फिल्म (इंग्रजी) व भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला. महापारेषणचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी जनसंपर्क विभागाचे अभिनंदन केले.
उत्तराखंडमधील डेहराडूनच्या हॉटेल एमरॉल्डमध्ये आयोजिलेल्या ४७ व्या भारतीय जनसंपर्क परिषदेच्या समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी `पीआरएसआय`चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक, सचिव डॉ. पीएलके मूर्ती, गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप गुप्ता, पद्मश्री डॉ. बी. व्ही. के. संजय यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment