Wednesday, 31 December 2025

ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

 ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

 

नागपूरदि. 11 : जायकवाडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने सन 2006 मध्ये पुरामध्ये बाधित झालेल्या ग्रामस्थांच्या ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर अखेरीस प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करून संबंधित नुकसानभरपाईची रक्कम ग्रामस्थांच्या खात्यात जमा केली जाईलअसे मदत व पुनर्वसन मकरंद पाटील यांनी सांगितले.

            विधानसभा सदस्य विजयसिंह पंडितहेमंत उगले यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडलीत्यास मंत्री श्री.पाटील यांनी उत्तर दिले.

            मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांनी सांगितले कीग्रामस्थांना बँकांनी तगादा न करण्याचे निर्देश सर्व बँकांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणेया विषयासंदर्भातील बैठक अधिवेशन संपल्यानंतर मुंबईत घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi