Monday, 8 December 2025

परभणीत टाटा टेक्नॉलॉजीचे सीआयआयआयटी

  

परभणीत टाटा टेक्नॉलॉजीचे सीआयआयआयटी  

मुंबई,दि, ८:- परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले गेले असून सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग (सीआयआयआयटी) प्रकल्पाला आता प्रत्यक्ष स्वरूप मिळणार आहे. ₹११५ कोटी खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची राज्य मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे मंजुरी  शक्य झाली आहे.

या अत्याधुनिक सीआयआयआयटी केंद्रातून दरवर्षी ३,००० विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ४.० युगातील प्रगत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे परभणी जिल्हा कौशल्य विकासाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार असून येथील तरुणांची रोजगारक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांना शहरांकडे स्थलांतर न करता आपल्या जिल्ह्यातच उच्च दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षणरोजगार आणि उद्योगसंधी उपलब्ध व्हाव्यातहा मेघना बोर्डीकर यांच्या दूरदर्शी विचार या प्रकल्पातून स्पष्ट दिसतो.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi