‘दिलखुलास’ 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात संचालक संजीव कर्पे यांची मुलाखत
मुंबई, दि. 15: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ‘पर्यावरण संतुलन व संवर्धनात बांबू लागवडीचे महत्त्व आणि रोजगार निर्मितीचे साधन’ या विषयावर कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर (कॉनबॅक) संचालक संजीव कर्पे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
'दिलखुलास' कार्यक्रमात ही मुलाखत दि. 16 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत रोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत ‘News on AIR’ या मोबाईल अॅजपवरही ऐकता येणार आहे. ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत दोन भागात प्रसारित होणार असून मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, दि. 16 डिसेंबर रोजी तर दुसरा भाग मंगळवार दि. 23 डिसेंबर रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
‘दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमाच्या माध्यमातून बांबू लागवडीद्वारे पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास, तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी कशा निर्माण होऊ शकतात, याविषयी संजीव कर्पे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ही मुलाखत निवेदिका सुषमा जाधव यांनी घेतली आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल.
X (Twitter): https://twitter.
Facebook : https://www.facebook.com/
YouTube : https://www.youtube.com/
No comments:
Post a Comment