सर्व बौद्धिक अक्षम विशेष शाळांचा दिशा अभियानात पूर्ण सहभाग अनिवार्य करण्यात आला आहे. मुख्याध्यापक व दिशा समन्वयक यांच्या बैठका, ऑनलाइन व प्रत्यक्ष प्रशिक्षण, वार्षिक दिशा कॅलेंडर आणि “दिशा अंमलबजावणी शाळा” संकल्पना राबविण्यावर भर देण्यात आला आहे. विशेष शाळांच्या नूतनीकरण प्रस्तावांमध्ये दिशा अभियानाची अंमलबजावणी नमूद करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन वर्षातून दोन वेळा करण्यात येणार असून, मध्य सत्र व अंतिम सत्रात सविस्तर मूल्यांकन करून त्याचा अहवाल पालकांना दिला जाणार आहे. ‘दिशा’ अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या शाळांना दिशा अंमलबजावणी करणाऱ्या शाळा म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार असून, निर्धारित निकष पूर्ण न करणाऱ्या शाळांवर अनुदान थांबविणे किंवा नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे .
याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने निर्गमित केला असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment