आयटी आणि स्टार्टअप क्षेत्राचे नवे केंद्र म्हणून परभणीची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. सेलू परिसरात सॉफ्टवेअर कंपन्यांना आमंत्रित करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातूनच आयटी क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग खुला केला आहे.
तरुणांनी “नोकरी शोधणारे” न राहता “नोकरी निर्माण करणारे” व्हावे, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन अंतर्गत नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन, मेंटॉरशिप आणि गरजेचे पाठबळ उपलब्ध करून देणारे उपक्रम राबवले जात आहेत.
मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या सर्वांगीण विकासदृष्टीतील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे महिला सक्षमीकरण. ग्रामीण महिला बचत गटांना जोडून ‘लखपती दीदी’ संकल्पनेनुसार कौशल्य प्रशिक्षण, लघुउद्योगांसाठी मार्गदर्शन तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे महिलांचे उत्पन्न, आत्मविश्वास आणि स्वावलंबन मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
No comments:
Post a Comment