राज्यात उत्पादित होणाऱ्या डाळिंब व अन्य फळांना
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
-पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. २४ : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
राज्यात उत्पादित झालेल्या डाळिंबाचे तीन कंटेनर वाशी येथील सुविधा केंद्रातून के.बी. एक्सपोर्ट्सचे चेअरमन प्रकाश खाखर यांनी नुकतेच ब्रिस्बेन - (ऑस्ट्रेलिया), न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस- (अमेरिका) येथे निर्यात केले. या पार्श्वभूमीवर पणन मंत्री रावल यांनी प्रकाश खाखर यांचे अभिनंदन केले. त्यावेळी ते बोलत होते.
No comments:
Post a Comment