बॉम्बे नाही, मुंबईच’ हीच राज्य शासनाची ठाम भूमिका
– मंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, दि. 13 : ‘बॉम्बे नाही, मुंबईच’ या मुद्द्यावर महाराष्ट्र शासनाची भूमिका अत्यंत स्पष्ट, अधिकृत आणि ठाम असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत सांगितले. हीच भूमिका यापूर्वी मांडण्यात आली असून, यापुढेही तीच सातत्याने मांडली जाईल, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री यांनी आयआयटी बॉम्बेच्या नावाबाबत केलेल्या विधानावर विधानपरिषद सदस्य ॲड.अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना मंत्री ॲड. शेलार बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवले असून, राज्याची भूमिका केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. मुंबईच्या नावासंदर्भात कोणताही संभ्रम नसून, राज्य शासन ‘मुंबई’ या नावालाच प्राधान्य देत असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment