न्यू तोतलाडोह पुनर्वसित गावातील विस्थापितांना नियमाप्रमाणे सुविधा द्या
- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
मुंबई, दि २४ : पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये दिल्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यू तोतलाडोह गावाचे विस्थापन झाल्याचे सांगून राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले की, वाडंबा येथे विस्थापित झालेल्या या गावाला कोणत्याही सुविधा मिळालेल्या नाहीत. आर्थिक मोबदला घेऊन त्यांना फक्त जमिनी दिल्या आहेत. त्यांना नागरी सुविधा देणे गरजेचे आहे. कायद्यानुसार त्यांना सुविधा देण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment