जिल्हा बँकेत पारदर्शी भरती प्रक्रिया राबवणार
- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
नागपूर, दि 12 : परभणी जिल्हा बँकेतील १५२ पदांच्या भरतीला २०२२ मध्ये मंजुरी देण्यात आली असून ही भरती आयबीपीएसमार्फत पारदर्शक पद्धतीने होणार आहे. बँकेच्या जाहिरातीला अनुसरुन १० हजारांहून अधिक अर्ज आले असल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली.
सदस्य राजेश विटेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सहकारमंत्री पाटील बोलत होते.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, अनुकंपा भरतीत झालेले गैरप्रकार लक्षात घेऊन भरती रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेतील पदांच्या भरतीसाठी 90 गुणांची लेखी परीक्षा आणि 10 गुणांची मुलाखत असे निकष असतील. स्थानिकांना संधी मिळावी म्हणून 70-30 चा फॉर्म्युला लागू केला असून 70 टक्के जागा जिल्ह्यातील उमेदवारांना दिल्या जातील.लातूर, नांदेड, सांगलीसह सर्व जिल्हा बँकांमध्ये पुढील काळात तीन मान्यताप्राप्त संस्थांमार्फत (टीसीएस, आयबीपीएस, एमकेसीएल) भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला असून ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शक राहील, गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment