Saturday, 27 December 2025

भाविकांना अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी आल्याचे आत्मिक समाधान मिळावे

 भाविकांना अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी आल्याचे आत्मिक समाधान मिळावे

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         नाशिक जिल्ह्यातील मालसाणे णमोकार तीर्थ विकासासाठी

36 कोटी 35 लाख रकमेच्या आराखड्याला मान्यता

 

मुंबईदि. 23 नाशिक जिल्ह्यातील मालसाणे (ता. चांदवड) येथील जैन धर्मियांच्या णमोकार तीर्थ विकासासाठी 36 कोटी 35 लाख रकमेच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमुळे भाविकांना येथे आल्यानंतर अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी येण्याचे आत्मिक समाधान मिळावे अशा पद्धतीने कामे पूर्ण करावीत,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

या ठिकाणी करण्यात येणारी कामे दर्जेदार असावीकोणत्याही कामात  तडजोड करण्यात येऊ नये. ही कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

या ठिकाणी 6 ते 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कामांमध्ये स्थायी स्वरूपातील 24 कोटी 26 लाख आणि महोत्सवाच्या आयोजनाकरिता 12 कोटी 9 लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वालआमदार राहुल आहेर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi