स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन
नवी दिल्ली, दि. 22 : मराठी भाषेतल्या साहित्य निर्मितीबद्दल राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार 2025 साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 1 जानेवारी ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात 30 जानेवारी 2026 पर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे पुस्तके पाठवावीत, असे आवाहन मंडळाच्या सचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
मंडळाच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता इतर ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात तर ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार असून प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध आहेत. लेखक आणि प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवू शकतात.
‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ हा खास बृहन्महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रदान करण्यात येणार आहे. या श्रेणीत उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी साहित्याच्या सर्व प्रकारातील साहित्यकृती या पुरस्कारासाठी पाठविता येणार असून उत्कृष्ट साहित्यकृतीस ‘सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार’ (पुरस्कार रक्कम 1,00,000 रूपये) प्रदान करण्यात येणार आहे.
बृहन्महाराष्ट्र क्षेत्रातील विजेत्यांसाठी ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ (सर्व साहित्य प्रकार) साठी निवड केली जाईल. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली यांच्याकडे 31 जानेवारी 2026 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार योजनेअंतर्गत एकूण चार विभागात 35 साहित्य प्रकारांसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रौढ वाड्:मय विभागात एकूण 22 साहित्य प्रकार असून प्रत्येकी 1 लाख रुपये या प्रमाणे एकूण 22 लाख रूपयांची पुरस्कारांची रक्कम आहे. बाल वाड्:मय विभागात एकूण सहा साहित्य प्रकारात प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे एकूण 3 लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे.
0000
No comments:
Post a Comment