Tuesday, 30 December 2025

भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कार्यवाही सुरु

 भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कार्यवाही सुरु

 - नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि. 9 - भटक्या कुत्र्यांसदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना देण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. मुंबई महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांसंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना श्रीमती मिसाळ बोलत होत्या.

सदस्य अतुल भातखळकरचेतन तुपेमहेश लांडगेसुरेश प्रभू यांनी या लक्षवेधीवरील चर्चेत सहभागी झाले होते. या संदर्भात लोकप्रतिनिधीची बैठक घेण्यात येईलअशी माहिती श्रीमती मिसाळ यांनी यावेळी सांगितले.

नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असून याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निर्देश दिले आहेत. यामध्ये भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बीजिकरणलसीकरण व जंतू निर्मूलन करणेया श्वानांसाठी आश्रय/निवाऱ्याची सोय करणेरुग्णालयांनी अँटी रेबीज लसचा अनिवार्य साठा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यस्तरावर आणि स्थानिक स्तरावर नोडल अधिकारी नेमण्यात आले आहे. या विषयासंदर्भात संयुक्त बैठक उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्रीग्रामविकास मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडे घेण्यात येईलअसे महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi