मतदार जागृती
महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार जागृती करण्याचे आदेश सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. पारंपरिक प्रसारमाध्यमांबरोबरच नवीन माध्यमांचा कौशल्यपूर्ण वापर करण्याबाबत आयोगाने 12 जून 2025 रोजी पत्राद्वारे सर्वांना निर्देश दिले आहेत. त्याबाबत वेळोवेळी आढावाही घेण्यात आला आहे. मतदार जागृतीसंदर्भातील सर्व सूचना व निर्देश मार्गदर्शक स्वरुपात असून, स्थानिक पातळीवर काही नावीन्यपूर्ण उपक्रम सुचल्यास तेही आपापल्या स्तरावर राबविण्याबाबत कळविण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पातळीवरूनही समाजमाध्यमांसह विविध माध्यमांसह विविध माध्यमांद्वारे मतदार जागृती करण्याचा प्रयत्न असेल. विशेषत: बृहन्मुंबईसह मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अधिक प्रमाणात मतदार जागृतीवर भर देण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने महानगरपालिका स्तरावर नियोजन केले जाईल.
No comments:
Post a Comment