Sunday, 7 December 2025

50 मराठी चित्रपटांना 14 कोटी 62 लाख रुपयांचे अर्थसहाय्य

 50 मराठी चित्रपटांना 14 कोटी 62 लाख रुपयांचे अर्थसहाय्य

–सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार

· चित्रपट नगरीचा अंतिम आराखडा मंजूर


· राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई, दि.5: सामाजिक आशय, कलात्मक दर्जा आणि प्रयोगशीलतेमुळे वेगळे ठरले आहेत. अशा 50 मराठी चित्रपटांना 14 कोटी 62 लाख रुपयांचे अर्थसहाय्य आपणास वितरित करत आहोत. सन्मानित करतो आहोत. ही केवळ आर्थिक मदत नसून सामाजिक आशय असलेल्या नावीन्यपूर्ण तंत्राचा वापर करणाऱ्या प्रेक्षकांच्या जाणीव जागृतीला हातभार लावणाऱ्या मराठी चित्रपटांना मदत करण्यासाठी शासन नेहमीच प्रोत्साहन देत आले आहे, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच चित्रपट नगरीचा अंतिम आराखडा मंजूर झालेला आहे असेही ते म्हणाले.


रविंद्र नाट्यमंदिरात सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा, गणेशोत्सव रिल्स स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चित्रपटाचे पोस्टर अनावरण केले. या कार्यक्रमप्रसंगी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड.आशिष शेलार बोलत होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi