ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ; मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह
शहरी बोगदा प्रकल्पातील टीबीएम प्रकल्पाचा शुभारंभ
मुंबई, दि 3 : पूर्व मुक्त मार्गामुळे नागरिकांना पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत 20-25 मिनिटांत पोहोचता येते; मात्र पुढील प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. तसेच पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी लांबचा मार्ग घ्यावा लागत होता. या समस्येवर तोडगा म्हणून ऑरेंज गेट बोगद्याची संकल्पना मडण्यात आली,या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ
No comments:
Post a Comment