Monday, 22 December 2025

पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांची कामे; 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर

 पुणे महानगर क्षेत्रात  220 प्रकल्पांची कामे32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर

-     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

        रस्ते विकास नियोजनानंतरच शहर विकास आराखडा तयार करण्यात यावा

        पुणे महानगर नियोजन समितीची पाचवी सभा

 

          नागपूरदि. 11 : राज्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेता शहरवासीयांना नागरी सोयी-सुविधा देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे.  पुणे शहराचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होत आहे.  त्या अनुषंगाने पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून त्यासाठी 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रस्ते विकास नियोजनानंतरच शहर विकासाचे आराखडे तयार करावेतअसे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

          पुणे महानगर नियोजन समितीच्या पाचव्या सभेचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रीपरिषद सभागृहात करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,  आमदार सर्वश्री तानाजी सावंतसुनील शेळकेसिद्धार्थ शिरोळेशंकर मांडेकरआदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi