पुरंदरमध्ये 191 किलो मीटर रस्त्यांच्या दुरुस्तीस मंजुरी;
119 कोटींच्या रस्ते रुंदीकरण कामांना वेग
- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
नागपूर, दि. १२ : पुरंदर तालुक्याचा रस्ते विकास वेगाने पुढे नेत 191 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीस शासनाने मंजुरी दिली असून अंदाजे 5 कोटी रुपयांच्या कामांना गती मिळाली आहे. यासोबतच 76 किमी सायकल ट्रॅकचे रुंदीकरण आणि एकूण 119 कोटी रुपयांची विस्तृत कामे पुरंदरमध्ये सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.
सदस्य विजय शिवतारे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री भोसले म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील 383 कि.मी. पंचायत समितीचे रस्ते व 268 कि.मी. एमडीआर रस्ते पावसामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने 191 कि.मी. रस्त्यांच्या दुरुस्तीस मंजुरी दिली आहे.
No comments:
Post a Comment