बेकायदेशीर विद्यार्थी वाहतूक संदर्भात
1 ते 31 जानेवारी दरम्यान राज्यव्यापी विशेष मोहीम राबविणार
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
नागपूर, दि. 11 : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांसंदर्भात विशेष मोहिम राबवली जाणार आहे. मुंबईसह राज्यभरात हा उपक्रम 1 ते 31 जानेवारीदरम्यान राबविण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य डॉ.नितीन राऊत यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे नागपूरमधील 2021 मध्ये झालेल्या स्कूल व्हॅन अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित केला, त्यावेळी ते उत्तरादाखल बोलत होते.
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, संबंधित पुलावर काम सुरू असल्याने अरुंद रस्त्यावरून दोन वाहनांची टक्कर होऊन चालक आणि 13 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत बेकायदेशीरपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या 248 वाहनांवर कारवाई करून 80 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
No comments:
Post a Comment