Sunday, 30 November 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन : अभ्यागतांसाठी सूचना व भित्तिपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन pl share

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन :

 अभ्यागतांसाठी सूचना व भित्तिपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन


            मुंबई दि.30- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी मुंबई येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी तयार करण्यात आलेल्या सुचना पुस्तिकेचे व भित्तीपत्रकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते रविवारी (दि. 3०) राजभवनमुंबई येथे करण्यात आले.

            यावेळी बोलताना राज्यपालांनी डॉ आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. ज्येष्ठ आर्य समाजी नेते आत्माराम अमृतसरी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविण्यास मदत व शिफारस केली असल्याचे त्यांनी सांगितले.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समरसता व बंधुभाव या मूल्यांच्या प्रचार प्रसारासाठी आपण विविध तालुक्यांना भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. आजपर्यंत आपण गुजरात येथील 11 गावांना भेट दिली असून त्याठिकाणी ग्राम स्वच्छतावृक्षारोपणग्रामसभादलित - आदिवासी कुटुंबाच्या घरी भोजनशाळेत मुक्काम व दुसऱ्या दिवशी शिवारावर जाऊन लोकांना नैसर्गिक शेतीचे महत्व पटवणे हा उपक्रम सुरु केला असल्याचे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रात देखील हा उपक्रम सुरु करणार  असल्याचे  त्यांनी  सांगितले.

            यावेळी महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधवडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे तसेच समितीचे इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi