शहरातील झोपडपट्टी आणि वंचित वस्त्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि परवडणाऱ्या स्वच्छता सुविधा देण्याचे उद्दिष्ट या केंद्रांमागे आहे. ५.५ लाख नागरिकांना आतापर्यंत याचा प्रत्यक्ष लाभ झाला असून, आरोग्यदृष्ट्यादेखील हे मॉडेल उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुविधा केंद्रे ही स्वच्छतेच्या शाश्वत व्यवस्थेचे महत्त्वपूर्ण घटक असून त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात आणखी सुविधा केंद्रे सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या महानगरात ‘सुविधा केंद्र’ मॉडेलने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उत्तम कामाचे उदाहरण निर्माण केले आहे. ही केंद्रे शहराच्या आरोग्यसुरक्षेत मोठे योगदान देत आहेत. या सुविधा केंद्रामध्ये उत्तम सुविधा, लोकांचा सहभाग, वर्तणूक बदल, आर्थिक आणि पर्यावरण टिकाव आणि कार्यक्षम संचालन यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. हे सर्व अत्यंत उल्लेखनीय असून हा उपक्रम शहरी महाराष्ट्रासाठी आदर्शवत आहे
No comments:
Post a Comment