Saturday, 29 November 2025

शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला

 शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला

मुंबईदि. 26 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 ऐवजी 22 फेब्रुवारी 2026  रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसईतर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटीदेखील 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सीटीईटी परीक्षेला बसणार असल्याने त्यांच्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचा दिवस बदलत नवीन तारीख 22 फेब्रुवारी 2026 जाहीर केली आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनीपालकांनीशाळांनी व परीक्षा केंद्रांनी या बदलाची नोंद घ्यावीअसे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi