Monday, 3 November 2025

ऊसतोड कामगारांना डीबीटीद्वारे मदतीचा प्रस्ताव सादर करावा

 ऊसतोड कामगारांना डीबीटीद्वारे मदतीचा प्रस्ताव सादर करावा

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

मुंबईदि. ३० : राज्यात ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला असूनअवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांना तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक मदतीचा प्रस्ताव सहकार विभागाने सादर करावाअशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

 

विधानभवनात उसतोड कामगारांच्या कल्याणार्थ प्रस्तावित चर्चा व पुढील दिशा ठरविण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेअपर विभागीय आयुक्त कोकण सिद्धराम सालीमठउपसचिव अंकुश शिंगाडेलोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र गोरणेराज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुण्याचे उपसंचालक डॉ. आशिष भारती उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi