माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी
दोन दिवशीय स्पर्श निवृत्तीवेतन मेळावा
सातारा दि. 20: माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी रक्षा लेखा नियंत्रक (आर्मी) दक्षिण कमान, पुणे स्पर्श आऊटरिच प्रोग्राम बाय पीसीडिऐ व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय स्पर्श निवृत्तीवेतन मेळावा दि. 20 व 21 नोव्हेंबर रोजी सैनिक स्कूल सातारा येथील डहाणूकर सभागृहात आयोजित होत आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात पुणे येथील मुख्य रक्षा लेखा नियंत्रक (आर्मी) दक्षिण कमानचे झोथानखुमा, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या कार्यक्रमास सैनिक स्कूल सातारा यांचे प्राचार्य कॅप्टन के. श्रीनिवासन हे अध्यक्षस्थानी होते. लेफ्टनंट कर्नल सतेश दैवानराव हांगे (निवृत्त), कर्नल प्रकाश नरहरी, लेफटनंट कर्नल गिता महाडीक, उपसंचालक सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पूणे तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा व पुणे उपस्थित होते.
या मेळाव्यात माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांना स्पर्श पेन्शनबाबतची अद्ययावत माहिती देण्यात आली. पेन्शनरचे जीवन प्रमाणपत्र डिजिटली सादर करण्यात येणाऱ्या अडीअडचणींचे निवारण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ७५० माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांनी उपस्थित होते. त्यामध्ये ९० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या वयोवृध्द शूरवीर सैनिकांचा व त्यांच्या पत्नींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
दि २१ नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायं 6 वाजेपर्यंत सैनिक स्कूल सातारा येथील डहाणूकर सभागृह येथे माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांना सर्व कागदपत्रांसह (उदा. डिस्चार्ज पुस्तक, पी.पी.ओ. ची कॉपी, बँक पासबूक, आधार कार्ड, पॅन कार्ड इ.) घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment