Sunday, 2 November 2025

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे ‘स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार

 केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड

 मॅन्युफॅक्चरिंग’ चे प्रकाशन

  • ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
  •  

पुणेदि. २९: केंद्र सरकार राष्ट्रीय उत्पादन अभियान (नॅशनल मन्युफॅक्चरिंग मिशन) सुरू करत असताना त्याबरोबरीने महाराष्ट्र शासनही राज्य उत्पादन अभियान’ सुरू करेलअशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच राज्यात जागतिक दर्जाची ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ स्थापन करण्यात येईलअसेही त्यांनी घोषित केले.

नीती आयोगाच्यावतीने यशदा येथे 'रिइमॅजनिंग मॅन्युफॅक्चरिंग : इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लिडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंगया विषयावर आयोजित 'द रोड टू इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६या परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारनीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यमनगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळमित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीनीती आयोगाच्या डिस्टिंग्विश्ड फेलो देबजानी घोषसीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी आदी उपस्थित होते.

मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासंदर्भातील रोडमॅप असलेला अत्यंत चांगला अहवाल पुण्यात प्रकाशित केल्याबद्दल नीती आयोगाला धन्यवाद देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेपुण्यात या क्षेत्रातील उन्नत तंत्रज्ञान पाहायला मिळते. उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी नव्या विचाराने पुढे जावे लागेल. त्यासाठी फ्रंटियर टेक्नॉलॉजी आवश्यक आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे जागतिक स्पर्धेत स्थान पक्के करण्यासोबत नव्या क्रांतीला सामोरे जाणे गरजेचे आहे. आज एआय’, क्वांटम कंम्प्युटिंग आणि सेमीकंडक्टर्स या तीन स्तंभांनी प्रत्येक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्रभावित केले आहे. त्याचा फायदा उठविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोतअसेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi