वृत्त क्र.4504
‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’च्या माध्यमातून वैचारिक कक्षा रुंदावतील
• चार दिवसीय ‘फेस्टिव्हल’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर, दि.23 : मनुष्याला मानवी संवेदना आहेत. ही संवेदना अभिव्यक्त करण्याचे वरदान त्याला लाभले आहे. ही अभिव्यक्ती करण्यासाठी त्याच्याकडे भाषा, साहित्य, पुस्तके ही माध्यमे आहेत. अभिव्यक्ती संपते तिथे संस्कृती संपते. त्यामुळे ही प्रगल्भ संस्कृती जपण्याची गरज असून हा सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम पुस्तकांच्या माध्यमातून होत असते. नागपूर पुस्तक महोत्सवांतर्गत होत असलेल्या झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हलच्या माध्यमातून प्रगल्भता येऊन जाणिवा विस्तारित होतील. विविधांगी विषय या फेस्टिव्हलमध्ये मांडण्यात येतील. त्यातून वैचारिक कक्षा रुंदावून प्रगल्भ व्यक्तिमत्व तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
No comments:
Post a Comment