स्व - संरक्षण प्रशिक्षण वर्गातून विद्यार्थिनी होतील आत्मनिर्भर
- जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते
जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या विद्यमाने वीरांगना प्रशिक्षण सुरू
धुळे, दि. २८ : विद्यार्थिनींना संकट समयी स्वत:चे संरक्षण करता यावे म्हणून प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यासाठीच जिल्हा प्रशासनाने वीरांगना प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून विद्यार्थिनी स्व संरक्षणात आत्मनिर्भर होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय वीरांगना प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
No comments:
Post a Comment