वंदे मातरम्' गीत देशाच्या सांस्कृतिक ऐक्याची भावना
- विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर
मुंबई,दि. 7 : वंदे मातरम् हे एक गीत नसून भारतवासीयांसाठी एक मंत्र आहे, ज्यातून प्रत्येक भारतीय एकमेकांशी जोडला गेलेला आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित 'वंदे मातरम' हे गीत भारताच्या ऐतिहासिक सुवर्णकाळाची, स्वतंत्र्यासाठी लढलेल्या माणसांच्या बलिदानाची आणि देशाच्या सांस्कृतिक ऐक्याची भावना व्यक्त करते, या शब्दात विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी विचार व्यक्त केले.
मुंबई विधानभवनच्या सेंट्रल हॉलमध्ये 'वंदे मातरम' गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, विधिमंडळाच्या सचिव मेघना तळेकर, सचिव डॉ.विलास आठवले, सचिव शिवदर्शन साठे, विधानपरिषद सभापतींचे सचिव पंडीत खेडकर, विधानसभा अध्यक्षांचे सचिव सुनील वाणी तसेच विधिमंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment