Thursday, 27 November 2025

युनेस्को मुख्यालयात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

 युनेस्को मुख्यालयात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

·         भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचाअपूर्व क्षण

 

मुंबईदि. २६:- महाराष्ट्र शासनाने युनेस्कोच्या मुख्यालयाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून दिला होता. या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्याने युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालय प्रांगणात  संविधान दिनीच डॉ. आंबेडकर यांचा पुतळा  दिमाखात उभा राहिला.

 

'हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्कोशी संबंधित सर्व पदाधिकारीवरिष्ठाधिकारी यांचे आभार मानले आहेत. ते म्हणतात, 'महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेने आणि प्रतिभेने जगाला समता-बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली. भारताला मिळालेले संविधान हे त्यांच्या उत्तुंग अशा कर्तृत्वाचा अविष्कार आहे. अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधान दिनीच अनावरण हे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राला मिळालेल्या संविधानप्रती व्यक्त झालेला परमोच्च आदराचा क्षण आहे. आम्ही हा क्षण महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती अभिवादनाची संधी मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हा पुतळा उभा रहावायासाठी प्रयत्नशील अशा सर्वांचे अभिनंदनही करतो. यानिमित्ताने सर्व नागरिकांना शुभेच्छा देतोअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi